सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण यांची कारवाई
आरोपीकडून सुमारे १३.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त

सांगली स्थानिक गुन्हे शाखेचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संजय कुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जयदीप कळेकर संदीप नलावडे संदीप गुरव अमिरशा फकीर नागेश खरात अतुल माने सागर टिंगरे सुनील जाधव यांनी उत्तर प्रदेश येथे जाऊन आरोपीचा शोध घेत असताना आरोपी हा सातारा जिल्ह्यात आल्या असल्याची गोपनीय माहिती त्यांना मिळाली होती…
सांगली (सनी लोंढे – सक्षम क्राईम वाच ब्युरो) : सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील सांगली जिल्हा बँकेचे लॉकर फोडल्या प्रकरणी आणखी एकाला सांगली स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक 7.1.2026 ते 8.1.2026 रोजी आटपाडी तालुक्यातील झरे येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतील पाठीमागील खिडकीच्या काचा फोडून गज गॅस कटरने कापून आत प्रवेश करून लॉकर रूम मधील 22 लॉकर गॅस कटरने तोडून ग्राहकाने ठेवलेले सोने व चांदीचे दागिने व पैसे चोरी करून घेऊन गेला होता सदरबाबत आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी गुन्हा उघडकीस करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

तसेच सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर मॅडम यांनी सदर घडलेल्या ठिकाणी भेट देऊन गुन्ह्याबाबत सविस्तर माहिती घेऊन सांगली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांना गुन्ह्याचा समांतर तपास करून आरोपीला अटक करण्याचा आदेश दिले होते वरील आदेशाच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी संजीव कुमार झाडे यांनी एक पथक तयार करून पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व पथकातील संदीप नलावडे नागेश खरात अतुल माने सागर टिंगरे सुनील जाधव अमीरशा फकीर यांनी यांना गोपनीय खबऱ्याच्या व तांत्रिक माहितीच्या आधारे माहिती मिळाली होती की निष्पन्न आरोपी बाबत माहिती काढत असताना संशयित आरोपी आदेश बाबुराम शर्मा रा उत्तर प्रदेश हा सातारा जिल्ह्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती आरोपीला पळून जाण्याची संधी न देता आरोपीला अटक त्याप्रमाणे सदर गुन्ह्यातील निष्पन्न आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेण्याकरता वरिष्ठांच्या परवानगीने सांगली पोलिसांनी उत्तर प्रदेश मध्ये आरोपी आदेश बाबुराम शर्मा रा हसनपुर हुरीयाई थाना आलापुर जिल्हा बदायू राज्य उत्तर प्रदेश याला अटक करून त्याची अंगझडती घेतल्यानंतर त्याच्या ताब्यातील सॅकमध्ये सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम आढळून आले त्याच्याकडे सदर दागिने बाबत विचारणा केली असता त्याने सदरचे दागिने दोन महिन्यापूर्वी त्याचा साथीदार बाबू कौसर इरफान शकील कुरेशी राहुल शर्मा सद्दाम सर्व रा उत्तर प्रदेश व अन्यसाथीदारासह मिळून सदर गुन्हा केला आहे अशी कबुली दिली आहे सदरची कारवाई सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय कुमार झाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर संदीप नलावडे सुरज थोरात नागेश खरात आमिरशा फकीर रोहन गास्ते सुनील जाधव उदय माळी रणजीत जाधव अरुण पाटील अनिल कोळेकर दरीब बंडगर सोमनाथ गुंडे सागर लवटे विक्रम खोत केरबा चव्हाण संदीप गुरव सुशांत चिले सतीश माने अतुल माने सायबर पोलीस ठाणे कॅप्टन गुंडावडे अभिजीत पाटील अजय पाटील यांची कारवाई