नाशिक : महाराष्ट्रातील नावाजलेले वृत्तपत्र सक्षम पोलिस टाइम्सने हनुमान जयंतीला १२ व्या वर्षात दिमाखात पदार्पण केले. गुरुवार दि. २एप्रिल २०२६ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा पार पडला. यावेळी योगी विश्वनाथ बाबाजी पिठाधीश सिद्ध नवनाथ धाम आदिनाथ आखाडा त्र्यंबकेश्वर ब, मुख्य संपादक विलास पाटील, निवासी संपादक मनोहर आहिरे, नगरसेविका कविताताई अमोल नाईक ,अखिल भारतीय सक्षम मिडिया फाउंडेशनच्या महिला प्रदेशाध्यक्ष, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब चौधरी पाटील उपमहापौर विलास शिंदे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आरंभी मंत्रघोषात दीप प्रज्वलन आणि श्री.हनुमान प्रतिमापूजन करण्यात आले. यानंतर अतिथी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि भूमिका मुख्य संपादक विलास पाटील यांनी विषद केली. यावेळी त्यांनी सक्षम पोलिस टाइम्सच्या ११ वर्षाच्या प्रवासाचा लेखाजोखा श्रोत्यांसमोर ठेवला. यात वर्धापनदिन, पत्रकारदिन, जागतिक महिलादिनानिमित्त विविध क्षेत्रातील गुणीजन सन्मान करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. त्याचप्रमाणे अखिल भारतीय सक्षम मिडिया फाउंडेशनच्या माध्यमातून पत्रकार बांधवांच्या